Top News

मराठी मायबोलीला विसरता कामा नये. मराठीचा अट्टाहास केल्याखेरीज जमणार नाही:- प्रा. डाॅ. परमानंद बावनकुळे

Bhairav Diwase.    Feb 27, 2021
पोंभूर्णाः- जगातल्या सर्व भाषा शिकाव्या परंतु मराठी मायबोलीला विसरता कामा नये. मराठी भाषेला संवर्धीत करावे लागत आहे ही वेळ येणे मराठी भषींसाठी आज आलेली आहे असे वक्तव्य मराठी भाषा दिनानिमित्त स्थानिक चिंतामणी काॅलेज ऑफ काॅमर्स, येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत असतांना गोडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा चिंतामणी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डाॅ. परमानंद बावनकुळे यांनी केले. ’मराठी भाषेची अस्मिता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना पुढे ते म्हणाले की, आज घरा घरात रॅट, कॅट, बॅट आहे आणि उंदीर मांजर नामशेष होत आहे. मराठी अस्मिता कायम ठेवण्यासाठी मराठीचा अट्टाहास केल्याखेरीज जमणार नाही याचे भान समाजाने ठेवणे अगत्याचे आहे.
       यावेळी महाविद्यालयाच्या मराठी अभ्यास मंडळाद्वारे कोरोना नियमांचे पालन करून कविता वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी विविध कविंच्या कविता सादर केल्या सदर स्पर्धेत बी.काॅम. भाग 3 च्या कु. शुभांगी रायसिडाम हीने प्रथम तर कु. हर्षदा साखलवार हीने द्वितीय क्रमांक पटकवीला. विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख बक्षीसाने सन्मानीत करण्यात आले. भैरव दिवसे, महेंद्र किरमे, भाग्यश्री खोब्रागडे व अभिलाश आकेमवार यांनी देखील आपल्या कविता सादर केल्या. 

        यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. टि. एफ. गुल्हाने यांनी अध्यक्षीय भाषण केले. तर मंचावर वाणिज्य विभागप्रमुख प्रा. नितिन उपरवट, प्रा. डाॅ. पुर्णिमा मेश्राम, आयोजक ग्रंथपाल प्रा. विजय बुधे उपस्थित होते. महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. ओमप्रकाश सोनोने यांनी सुत्रसंचालन केले तर अभिलाश आकेमवार यांने आहे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने