चंदनखेडा येथे आदिवासी माना जमातीचा समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- आदिवासी माना जमात  संघटना चंदनखेडा यांच्या वतीने दोन दिवसीय समाज प्रबोधन कार्यक्रम राजमाता माॅ मानिका क्लब ग्राउंड चंदनखेडा येथे नुकताच साजरा करण्यात आला.    

               पहिल्या दिवशी सकाळी परिसर स्वच्छता ,सर्व माना जमाती मधील बांधवांनी आपल्या रुढी परंपरे नुसार खण, (मुठपुजा)  डायका कार्यक्रम पार पाडला. दुपारनंतर महिलांसाठी विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या.  दुसऱ्या दिवशी माना जमातीचे  प्रेरणास्थान राजमाता माॅ मानिका  व महामानवांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली आणि मार्गदर्शनात्मक कार्यक्रंम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी चंदनखेडा येथील नवनिर्वाचित सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
               
       यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल हनवते होते. उद्घाटक म्हणून नयन जांभुळे, मार्गदर्शक गणेश हनवते, प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते माधव नन्नावरे, बंडू निखाते, प्रकाश भरडे ,सुशिलाबाई हनवते, नवनिर्वाचित सदस्या आषा नन्नावरे ,रंजना हनवते,आणि बहुसंख्य जमात बांधव व गावकरी कार्यक्रमाला उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल हनवते यांनी केले.संचालन  प्रशांत नन्नावरे यांनी केले.तर  आभार मंगेश नन्नावरे यांनी मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी सर्व माना जमात व ग्रामवासी यांनी मोलाचे सहकार्य केले.