🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चनाखा लगत चालू असलेल्या कोंबडा बजारावर पोलिसांची धाड.

विरुर पोलिसांची कार्यवाही; दोन लाखाचा मुद्देमाल जप्त.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन पोलीस ठाणे अंतर्गत येणार्‍या चनाखा या गावाजवळ कोंबड बाजार सुरू असतांना विरूर पोलिसांनी धाड घालून कोंबडे, रोख रक्कम व तीन मोटरसायकल सह एकूण दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
   आज दिनांक 7 फेब्रुवारीला दुपारी चार वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. आज दुपारी चनाखा या गावाजवळ काही इसमांनी कोंबड्याच्या झुंजी लावून जुगार खेळत असतांना पोलिसांनी धाड घातली. 
कार्यवाहीत तीन पाती लावलेले कोंबडे, नगदी रक्कम, तीन मोटरसायकल असा एकूण 1 लाख 96 हजार 120 रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आकाश वाघमारे, विनोद पारखी, स्वप्निल कोडापे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार झाले. पोलिसांनी जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून विरुर ठाणेदार कृष्णा तिवारी, पोलीस उपनिरीक्षक सदानंद वदतकर, सहाय्यक फौजदार सफरद खान पठाण, हवालदार दिवाकर पवार यांनी ही कारवाई केली. पुढील तपास विरूर पोलीस करीत आहे.