🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

"या" गावातील ग्रामपंचायतीत प्रेमवीरांची बाजी.

निवडून आलेल्या तब्बल ६ सदस्यांनी केलंय "लव्ह मॅरेज"
Bhairav Diwase.     Feb 07, 2021
गोंडपिपरी:- गावात ग्रामपंचायत निवडणुक लागली. अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.ज्यांनी त्यांनी आपआपल्या परीने प्रचार केला. निकाल लागला अनं अकरा सदस्यापैकी प्रेमविवाह केलेल्या सहा सदस्यांनी निवडणुकीत बाजी मारली. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सरपंच, उपसरपंच पदाची निवड होणार आहे. या पदावरही हेच प्रेमवीर विराजमान होणार आहेत? गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात प्रेमवीरांचा झालेला विजय राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

       गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे काॅग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचे जन्मगाव आहे. प्रेमनगरी म्हणूनही या गावाची एक वेगळी ओळख आहे. गेल्या अनेक वर्षात या गावात प्रेमविवाहाचे शतकपार झाले. यात बहुतांश आंतरजातीय विवाहांचा समावेश आहे. प्रेमविवाहातून सुखाने संसार सुरू असतांना आता त्यांना राजकीय सत्तेचे वेध लागले. यंदा सदस्य निवडून आल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण पाडण्यात आले. यामुळे अनेक प्रेमवीरांनी आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरविले.

तर काही प्रेमवीर स्वत उभे राहिले. करंजी हे गोंडपिपरी तालुक्यातील संवेदनशिल गाव. गावात नेहमीच दोन गट आमनेसामने उभे असतात. पण यंदाची निवडणुक खऱ्या अर्थाने गाजविली ती प्रेमविरांनी. ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला अनं अकरा सदस्यापैकी तब्बल सहा प्रेमविवाह केलेल्यांनी विजयश्री मिळविली. गावातील समीर निमगडे, जानवी तेलकापल्लीवार, जयश्री भडके, आरती निमगडे, शितल वाढई, सरिता पेटकर या निवडून आलेल्या सहा उमेदवारांनी प्रेमविवाह केला आहे.

सदस्यपदाची निवडणुक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण पडले. दि.8 फेब्रुवारी रोजी सरपंच, उपसरपंच पदाची निवड होणार आहे. यात निवडून आलेल्या प्रेमविवाह करणाऱ्या उमेदवारांचीच वर्णी लागणार आहे. एकीकडे सहा प्रेमविवाह करणाऱ्याच्या पदरी विजयाची माळ पळली असतांना स्मिता चांदेकर या प्रेमविवाह करणाऱ्या उमेदवाराला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. करंजी गावातील प्रेमविवाह करणाऱ्यांनी बाजी मारल्याने हि चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे.
📰सकाळ.......🗞️