Click Here...👇👇👇

जिवती तालुक्यातील टेकामांडवा येथे आगीचे तांडव.

Bhairav Diwase
शेतकऱ्यांची घरे व जनावरे जळून खाक.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिवती येथे आज दुपारच्या सुमारास 3 शेतकऱ्यांच्या घराला अचानक आग लागल्याने गावात खळबळ उडाली होती. हळूहळू या आगीने रौद्र रूप घेतले ज्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान होत जनावरे सुद्धा जळून खाक झाले. जीवती तालुक्यातील टेकामांडवा येथे सुमारे चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागून श्री परशुराम व्यंकटी सोलंकर, श्री सुरेश व्यंकटी सोलंकर, आणि श्री शिवशंकर पीराजी तरडे, अशा तीन शेतकऱ्यांची घरे शेतात कामाला गेले असता अचानक घराला आग लागून संपूर्ण घरे जळून खाक झाली.

   गावकऱ्यांच्या प्रसंगावधानाणे आग विजवल्याणे गाँव जाळाचे वाचले. मात्र अग्निशमन विभागला फोन करून सुध्दा गाडीची टाळाटाळ करण्यात आली. सदर घटनेचा पंचनामा टेकामांडवा तलाठि सांजा क्रमांक । 2 चे तलाठि सतीश मिटकर यानी तत्काळ करून श्री सुरेश सोलंकर यांचे अंदाजे कीमत 3,18,500 आणि श्री परशुराम सोलंकर यांचे 2,95,750 रू आणि शिवशंकर तरडे यांचे 2,33,600 रू असे एकुण नुकसान झाले असे नमूद केले आहे . सदर घटनेत शेतकर्यांची घरातील वस्तु, अनाज, सोने चांदीची दागिने, रोख रक्कम आणि घरातील कागद पत्रे, आणि जनावरे गाय, वासरू, शेळ्या, मेंड्या, लोखंडी पत्रे संपुर्ण जळून खाक झाल्याने गावात हळ हळ पसरली आहे, सदर घटानेकडे शासनाने तत्काळ लक्ष देऊन मदत करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

Popular posts......लोकप्रिय पोस्ट ......

गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी..... 

आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या.

चंद्रपूरांनो सावधान! 500 रु. तर मिळणार नाहीत, पण गंडा कितीचा बसेल सांगताही येणार नाही. 

राजुरा ब्रेकिंग न्यूज; राजु यादव हत्याकांडातील आरोपींना अटक.