शुभम कोहपरे यांची ओळख वरोरा विधानसभा क्षेत्राचा मनविसेचा ढाण्या वाघ म्हणुन ओळख.
वरोरा:- महाराष्ट्र नवनिर्मांण विध्यार्थी सेनेचे वरोरा तालुका उपाध्यक्ष शुभम कोहपरे यांनी मनसेला 02 वर्षांपूर्वी राजीनामा दिला होता. मनविसे चे उपाध्यक्ष असतानी विद्यार्थ्यांसाठी बसची समस्या असो, शैक्षणीक समस्या असो, ते नेहमी आपली योग्य जबाबदारी पार पाडली होती. मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार योग्य त्या ठिकाणी निवेदने, आंदोलने, तसेच न घाबरता तत्परतेने कोणत्याही समस्येला समोर जावुन धाडस दाखवले होते. पण काही कारणास्तव महाराष्ट्र नवनिर्मांण विध्यार्थी सेनेचे वरोरा तालुका उपाध्यक्ष शुभमभाऊ कोहपरे यांनी मनसेला 02 वर्षांपूर्वी राजीनामा दिला होता. शुभम कोहपरे यांनी राजकारणातुन निवृत्ती घेवृन शांत राहण्याच्या विचार केला. पण त्यांनी किसान युवा क्रांती संघटना वरोरा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी हाती घेतली व योग्य रित्या शेतकरी बांधवांच्या न्याय व हक्कासाठी लढ्यास सुरुवात केली. व तो लढा पुर्ण यशस्वी पणे पार पाडली.
शुभम कोहपरे यांची ओळख वरोरा विधानसभा क्षेत्राचा मनविसेचा ढाण्या वाघ म्हणुन होती. व आज तोच जुना ढान्या वाघ मनसेमध्ये दाखल होणार हे निश्चित झाले आहे. शुभम कोहपरे यांच्या घरवापसी या बातमीमुळे वरोरा तालुका मनसेमध्ये आनंदमय वातावरण निर्मांण झाले आहे. लवकरच आपण मनसे मध्ये प्रवेश करणार आहे, असे आधार न्यूज नेटवर्कच्या टिम सोबत बोलताना शुभम कोहपरे यांनी सांगितले.