प्रा. अनिल ठाकुरवार यांचे निधन.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष शेतकरी संघटनेचे नेते प्रा. अनिल ठाकुरवार यांचे नागपूर येथे निधन झाले. किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    प्रा. अनिल ठाकुरवार हे मूळचे मोहोळ येथील रहिवासी होते नंतर ते राजुरा येथे स्थायिक झाले. राजुरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

त्यांची निधनाने राजुरा शहरावर शोककळा पसरली आहे.