🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भाजपाने नेहमी स्त्रीशक्तीला योग्य स्थान आणि योग्य सन्मान देण्याचे कार्य केले:- सौ. संध्या गुरनुले.

वाहीत भाजपचा महिला मेळावा संपन्न.
Bhairav Diwase.     Feb 14, 2021
सिंदेवाही:- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंदेवाही यांच्या वतीने आज महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
 याप्रसंगी मार्गदर्शकस्थानाहून बोलतांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले म्हणाल्या, देशाच्या कणखर नेत्या आपणासर्वांच्या आदर्श स्व. सुषमाजींना सर्वप्रथम मी वंदन करते. या महिला मेळाव्याला मोठ्या संख्‍येने महिला भगिनी उपस्थित आहेत. आज सर्वच क्षेत्रात स्‍त्रीया आपले वर्चस्‍व प्रस्तापित करतांना दिसतात. आपण पाहतो आजच्‍या स्‍त्रीने पुरूषांच्‍या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात मजल मारली आहे. देशाच्या राजकारणापासून तर समाजकारण आणि अर्थकारणावरही स्त्रीयांनी स्वतंत्र अशी छाप सोडली आहे. देशातील महिला आत्‍मनिर्भर व्‍हाव्‍यात, त्या स्वसिद्ध व्‍हाव्‍यात यासाठी सन्मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अनेक महत्‍वाचे निर्णय केले आहेत. यासोबतच आदरणीय सुधीरभाऊ अर्थमंत्री असताना महिलांच्‍या हिताचे अनेक निर्णय राज्यात घेतले गेले. 
आजची स्त्री अबला नसुना सबला आहे. राणी लक्ष्‍मीबाई, राजमाता जिजाबाई, क्रांतीज्‍योती सावित्रीआई अशा थोर महिलांचा वारसा आपल्याला लाभला आहे. एवढंच नाही तर भाजपात देखील आधीपासूनचं स्त्रियांना सन्मानाचे स्थान आहे यामध्ये मग स्व. विजयाराजे सिंधिया, स्व. सुषमा जी, वसुंधरा राजे, सुमित्राताई, उमा भारती, निर्मलाजी, स्मृति ईरानी, मेनका गांधी, पंकजाताई अशा अनेक स्त्रिया आपल्या पक्षात नावारूपास येऊन देशाच्या मोठमोठ्या संवैधानिक पदी पदारूढ झाल्याचे सर्वश्रुत आहे. आत्ताच जिल्ह्यात अनेक तालुक्यांत निवडणुका पार पडून गावच्या सरपंचा उपसरपंचा महिला झाल्या. आज आमच्या जिल्हा परिषदेतही पदाधिकाऱ्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांत महिलांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे आता महिला मोर्चाच्या रणरागिनींही एकीने पुढे येत सर्व क्षेत्र काबीज करावे असेही त्या म्हणाल्या.

यावेळी मंचावर, क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय देवतळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. रेखाताई कारेकर, आ. बंटीभाऊ भांगडीया, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. वनिता कानडे, समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, श्रीकांत भांगडीया, तालुकाध्यक्ष राजेंद्र पा. बोरकर, माजी जि. प. उपाध्यक्षा सौ. कल्पना बोरकर, सौ. मेघाताई भांगडिया, माजी नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई गेडाम, पं. स. सभापती सौ. मंदा बाळबुद्धे, उपसभापती सौ. शीला कन्नाके, वसंत वारजुकर, कमलाकर सिद्धमशेट्टीवार, नगरसेविका सौ.शालिनी बोरकर, अविनाश पाल, संतोष रडके, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ.नीलिमा गभणे, महामंत्री सौ.गीताताई पर्वते आदींसह तालुक्यातून मोठ्या संख्येने महिलाभगिनी उपस्थित होत्या.