Top News

कोरोना संकट काळात पोलीस विभागाची कामगिरी अतुलनीय:- हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री

मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमी च्या माध्यमातून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सुरक्षा किट चे वितरण.
Bhairav Diwase.          Feb 09, 2021

चंद्रपूर:- संपूर्ण विश्व कोरोनो संकटात अडकला असतांना भारतात सुद्धा याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन चा लोकोपयोगी निर्णय घेतला. या लॉकडाऊन  काळात आरोग्य विभाग, पोलीस विभाग, टपाल विभाग, वीज कर्मचारी तसेच इतर विभागाने आपले कर्तव्य यशस्वीपणे व जबाबदारीने पार पाडले. यातच पोलीस विभागाने या लॉकडाऊन ची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.आपल्या कुटुंबाचा विसर ठेवून लोकांच्या सेवेत पोलीस विभागाने आपले कर्त्यव्य पूर्ण केले,  त्यांचे हे कार्य अतुलनीय आहे असे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमी च्या माध्यमातून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनो संकटाशी लढण्यासाठी उपयोगी किट चे वितरण प्रसंगी अहीर बोलत होते. 
            
         प्रसंगी मॅक्स लाईफ इन्शुरन्स चे चंद्रपूर कार्यालय प्रमुख मनीष नाथ, चंद्रपूर न. प. चे माजी नगराध्यक्ष विजय राऊत, माजी उपमहापौर तथा नगरसेवक अनिल फुलझेले, रघुवीर अहीर,  कंपनी च्या प्रशिक्षण प्रबंधक शिखा सिंह, प्रबंधक मोहन आंबेकर, भाजपचे पूनम तिवारी, राजू घरोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
                  
         देशात कोरोनो बाधितांची संख्या कमी होत असतांना दिसत असली तरीही या संकटाचे सावट आजही सर्वांवरती आहे. या संकटावर मात करण्यासाठी सुरक्षा उपाय हेच प्राथमिक काळजी असल्याचे यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले. कोरोना संकटावर मात घालण्यासाठी सुरक्षा किट हि महत्वाची बाजू असतांना या किट चे वितरण पोलीस विभागाला करतांना एक प्रकारे त्यांच्या जबाबदारी व कर्तव्याचा सन्मान  करण्याची संधी मिळाल्याचा आनंद यावेळी अहीर यांनी व्यक्त केला. 
                            
         मॅक्स लाईफ इन्शुरन्स चे कार्यालय प्रमुख मनीष नाथ यांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या कोरोनो संकटातील निष्ठा व कर्तव्यावर प्रकाश टाकत त्यांच्या सेवावृत्ती भावाचा सन्मान करण्याची संधी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यामुळे प्राप्त झाल्याचा समाधान व्यक्त केले.  पुढे बोलतांना नाथ यांनी या पोलीस विभागाचा सन्मान कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर, वाहतूक पोलीस निरीक्षक यादव जी यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने