🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

परमडोली ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील परमडोली ग्रामपंचायतच्या सरपंच आणि उपसरपंच यांची आज निवड करण्यात आली असून सदर ग्रामपंचायतवर भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकविला आहे.

     महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर परमडोली ग्रामपंचायत असून येथे नुकत्याच झालेल्या निवडणूकित नऊ उमेदवार निवडून आले आहेत. निवडणूक झाल्यानंतर कोणाचा उमेदवार सरपंच होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र भाजपने नऊपैकी लिनाबाई भारत बिऱ्हाड़े, ललिता ईश्वर आडे, धरमु किसन सोनकांबळे, संगीता व्यंकटी कोटम्बे आणि माधव शेषराव तेलंगे या पाच उमेदवारांना आपल्याकडे ओढले होते. आणि आज झालेल्या सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीत आपले वर्चस्व दाखविले. सरपंचपद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्यामुळे सरपंच पदी लिनाबाई भारत बिऱ्हाडे यांची निवड करण्यात आली तर उपसरपंच म्हणून ललिता ईश्वर आडे यांची निवड करण्यात आली आहे. विजयी उमेदवारांचे   भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, पंचायत समिती उपसभापती महेशजी देवकते,दत्ताजी राठोड, भाजपा नेते प्रल्हाद मदने यांच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले.