🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आफ्रोह संघटनेचा राज्यस्तरीय महामेळावा १४ ला नागपूरात.

जिल्ह्यातून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन ( OFROH ) या कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय  महामेळाळा दि.14 फेब्रुवारी 2021 रोज रविवारला दुपारी 1:30 ते सायं.5 वाजेपर्यत नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. 
          
    या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी  संघटनेचे राज्य अध्यक्ष  शिवानंद सहारकर राहणार आहेत. आफ्रोह संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून सदर राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणी ने कर्मचाऱ्यांची सभा घेऊन कार्यक्रमास उपस्थित राहण्यास आवाहन केले. प्रत्येक जिल्ह्यातील आढावा घेतला असता अमरावती,अकोला, बुलढाणा,वर्धा,यवतमाळ,चंद्रपूर, भंडारा, गोंदिया,गडचिरोली, वाशिम,बुलढाणा या विदर्भाच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कर्मचारी बांधव  उपस्थित राहणार आहेत.
                  
 या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी  ऊर्जामंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त कर्मचारी बांधवांनी मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन आफ्रोह संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बोधे आणि जिल्हा सचिव कैलास उरकुडे यांनी केले आहे.
               
    नागपूरला जाण्यासाठी रविवारी स.१० वा.चंद्रपूरवरून जिल्हा कार्यकारिणी ने  संघटनेचे ब्यानर असलेली गाडी ठेवली आहे. तरी याचा लाभ घ्यावा.असेही आवाहन करण्यात आले आहे.
    
                   मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र  आणि खानदेशातील कर्मचारी मोठ्या संख्येत सहभागी होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.