(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर वा. नरड वरोरा
वरोरा:-वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथील जवळील अर्जुनी या गावातील एका शेतात 3 वर्षीय नर वाघाचा मृतदेह आढळला.
मृतक वाघाच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या असून शवविच्छेदन झाल्यावर वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल. सदर मृतदेह बफर क्षेत्रात मिळाला असून वाघाचा मृत्यू वाघांच्या झुंजीत झाला असावा असा अंदाज वर्तविल्या जात आहे.