Top News

सावधान! पोंभुर्णाचे प्रशासन ऍक्शन मोड मध्ये.

मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई.
Bhairav Diwase.      Feb 20, 2021
पोंभुर्णा:- कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क लावणे बंधनकारक आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर 500 रुपयांचा दंड आकारण्याचेही निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.


     टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा वावर मर्यादित होता. पण टाळेबंदी संपल्यानंतर गर्दीचे प्रमाण वाढले. ही परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून सुरक्षित अंतर राखण्यासह मास्कच्या वापरासाठी जनजागृती केली जात आहे. असे असले तरी पोंभुर्णा मध्ये मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण बरेच वाढले होते. त्यामुळे पोंभुर्णा प्रशासनाने कारवाई आणखी तीव्र केली आहे.

       कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर अत्यंत प्रभावी ठरत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी मास्क वापरावा, हा कारवाईमागील उद्देश आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, सोशल डिस्टन्स पाळावे, कोरोनाचे लक्षणे आढळून आल्यास किंवा आपण कोणाच्या संपर्कात आल्यास तातडीने स्वतःची तपासणी करून आपल्या कुटुंबाची, समाजाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन पोंभुर्णा प्रशासनांनी नागरिकांना केले आहे.
       

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने