विरोधकांनी गावच्या विकास कामात अडथळा निर्माण करू नये, सरपंच अपर्णा रेचनकर यांची विरोधकांना समज.

Bhairav Diwase

Bhairav Diwase. Feb 20, 2021
गोंडपिपरी:- शासनाच्या विविध योजनेच्या विकास निधीतून सकमुर गावचा विकास होत असताना काही समाजविघातक घटक तत्व विकास कामात अडथळा निर्माण करीत असल्यामुळे विरोधकांनी विरोधासाठी विरोध करावा, परंतु गावच्या विकासात अडथळा निर्माण करु नये, अशी समज सरपंच सौ अपर्णा अशोक रेचनकर यांनी विरोधकांना दिली आहे.

सरपंच सौ अपर्णा रेचनकर यांनी सांगितल्यानुसार गावात खनिज विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामास मंजुरी मिळाली आहे. मात्र ती ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सदर काम करता आले नाही. आचारसंहिता संपल्यानंतर लगेच या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल. असेही सरपंच सौ.अपर्णा अशोक रेचनकर यांनी सांगितले. परंतु सुडाचे राजकारण करणाऱ्या काही लोकांना विकास आवडत नसल्यामुळे केवळ आणि केवळ स्वार्थ आणि तूच्छ भावनेतूनआपल्यावर आरोप करून खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.

गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर या गावात खनिज विकास निधी अंतर्गत चालू असलेल्या सिमेंट रोड बांधकामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न गावातील काही लोक करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याने हा पराभव पचनी पडत नसल्यामुळे काही लोकांनी महिला असलेल्या सरपंचास त्रास होईल असे कृत्य करीत आहेत. चांगल्या कामात विरोध होतोच आम्ही अशा लोकांना जुमानत नाही. मात्र विकासकामात कुठलीही कमतरता पडू देणार नाही.
अशोक रेचनकर, 
उपसभापती 
कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी