Top News

ओबीसी जनगणनेसाठी तयार केलेली पाटी चक्क लग्नपत्रिकेवर

सोशल मीडियावर लग्न पत्रिका व्हायरल.
इंटरनेटच्या या युगात कोण कुठे आणि कधी व्हायरल होईल याचा नेमच नाही.  सोशल मीडियावर एक लग्न पत्रिका व्हायरल होत आहे. त्या मध्ये अनेक महान पुरुषांच्या विचारांची साक्ष देणारी ही लग्न पत्रिका आणि ओबीसी जनगणना झाली पाहिजे व ओबीसी जनगणनेचे फायदे काय आहेत. लग्नपत्रिकेवर स्पष्ट सांगण्यात आलेले आहे.

हि सोशल मीडियावर व्हायरल होणारी लग्नपत्रिका ॲड आशिष संग केश्विनी यांच्या लग्नाची आहे. राजर्षी शाहू महाराज नगर ब्रम्हपुरी येथील ॲड आशिष स्मृतीशेष गोंडाणे यांचा विवाह ब्रम्हपुरी तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव येथील केश्विनी दिवाकर लोखंडे यांच्या कन्येशी २८ फेब्रुवारी २०२१ ला बुद्धविहार, अऱ्हेरनवरगाव येथे संपन्न होत आहे. 

एस.सी (SC) प्रवर्गात समाविष्ट असलेल्या मुलाने आपल्या लग्नाच्या पत्रिकेवर ओबीसी जनगणना झाली पाहिजे म्हणुन त्या व्यक्तीने ओबीसी जनगणनेसाठी तयार केलेली पाटी चक्क लग्नपत्रिकेवर ठळकपणे समोर छपाई करून घेतली. ओबीसी प्रवर्गातील नागरीकांनी प्रेरणा घेण्यासाठी हि पत्रिका आकर्षित करीत आहे. ओबीसी जनगणना झालीच पाहिजे यासाठी प्रत्येक व्यक्तीनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी.

जनगणना २०२१ मध्ये OBC ( VJ/DNT/NT /SBC) चा कालम नाही. म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही. जय ओबीसी..... जय संविधान

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने