🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

फिस्कुटी ग्रामपंचायतीवर नितीन गुरनुले सरपंच तर उपसरपंचपदी राकेश गिरडकर अविरोध.

तब्बल १५ वर्षांनंतर फिस्कुटीत फुलले कमळ.
Bhairav Diwase. Feb 08, 2021
मुल:- मुल तालुक्यात पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकित तालुक्यातील बहुचर्चित फिस्कुटी ग्रामपंचायतीवर अखेर तब्बल पंधरा वर्षांनी कमळ फुलून भाजप समर्पित शेतकरी ग्रामीण विकास पॅनलने सत्ता काबीज केली. यामध्ये सरपंच म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचे जेष्ठ सुपुत्र नितीन गुरनुले यांची सरपंच पदी तर उपसरपंच पदी राकेश गिरडकर यांची अविरोध निवड करण्यात आली.

नऊ सदस्यीय असलेल्या फिस्कुटी ग्रामपंचायतीवर गेली पंधरा वर्षे काँग्रेस विचारधारेची सत्ता होती, परंतु यंदा स्वगावीचे हे जुने चित्र पालटून गावात विकासाचे नवे अध्याय सुरू करण्याचे मनोमन स्वप्न बाळगून असणाऱ्या सौ. संध्या गुरनुले यांनी स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या हुशार आणि युवा कार्यकर्त्यांची फळी उभी करून निवडणुकीचे सुयोग्य नियोजन आखले. गावात जागोजागी झालेल्या प्रत्येक कॉर्नर सभेत त्यांनी गाव विकासाचा मुद्दा रेटून धरला. आपल्या विचाराची सत्ता ग्रामपंचायतीवर आल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासासोबतचं लोककल्याणाचे अनेक कामे शासन स्तरावरून आपल्याला गावात खेचून आणता येतील. आणि वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचारांचा आदर्श गाव आपण निर्माण करू शकू. हा आशावाद त्यांनी मतदारांना पटवून दिला. त्यांच्या या प्रचाराची जादू अशी चाचली की, गावच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि मतदारराजानी भाजपधार्जिण्या पॅनलला स्पष्ट बहुमत दिले.

       याठिकाणी तब्बल १५ वर्ष ग्रामपंचायतीवर ताबा असलेली काँग्रेस भुईसपाट झाली.
शनिवारी, विजयाचा आनंदोत्सव साजरा करत सौ. संध्या गुरनुले यांनी विजयी वीट दाखवून प्रतिक्रिया देतांना, हा विजय फिस्कुटीतील प्रत्येक मतदाराचा आहे, आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन क्षेत्रात विकासाच्या झंजावाताने निर्माण केलेल्या विकासकारी चैतन्याचे द्योतक म्हणून याकडे आपण पाहिले पाहिजे. पुढे सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढिल यशस्वी वाटचालिसाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यासोबतच येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून विकासाची अनेकानेक कामे फिस्कुटीत व्हावी अशी मी अपेक्षा धरते. असेही त्या म्हणाल्या.

तसेच हे विजयीरथ खेचून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार्‍या सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे त्यांनी याठिकाणी आभारही मानले.