Top News

जीवनात एकतरी छंद जोपासावा:- राजू भोयर

आदर्श शाळेत दगडांची प्रदर्शनी; पाठ्यपुस्तकातील पाठ प्रात्यक्षिकातून समजाऊन घेतला.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- बालवयापासून विध्यार्थी दशेतच अनेक प्रश् विचारणे ,निरीक्षण क्षमता ,संग्रहव्रुत्ती जोपासत जीवनात एकातरी गोष्टीचा छंद आपण जोपासला पाहिजे.संग्रह करायला अनेक क्षेत्र खुले आहे.आपण आपली आवड लक्षात घेऊन आपले छंद जोपासले पाहिजे असे प्रतिपादन राजू भोयर यांनी आयोजित दगड प्रदर्शनी कार्यक्रमातून केले.बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील इयत्ता सातवींच्या विध्यार्थी व राष्ट्रीय हरित सेना विभागा मार्फत पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख व इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक बादल बेले यांच्या मार्गदर्शनात  नुकतीच दगडांची प्रदर्शनी आयोजित केली होती.
   
  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे यांची उपस्थिति होती.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजू सावित्रीबाईं मारोती भोयर व प्रमुख अतिथि म्हणून आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर यांची उपस्थिति होती.  इयत्ता सातवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात "धोंडा " नावाचा पाठ आहे.या पाठातील विध्यार्थीच्या अंगी असणारे दगडधोंडे संग्रहव्रुत्ती मुळे एक मोठा अनर्थ टळलेला होता. त्याची निरीक्षण क्षमता ,प्रश्न विचारणे ,संग्रह करणे ,एखाद्या नवीन गोष्टीची माहिती समजून घेणे इत्यादी बाबींचा या पाठात समावेश असल्यामुळे वर्गातील विध्यार्थीना प्रत्यक्ष दगडांचा संग्रह बघता यावा व दगडांविषयीची माहिती समजून घेता यावी यांकरीता ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. राजू भोयर यांनी सण २००५ पासून दगड संग्रहाला सुरुवात केली. त्यांच्याकडे वेगवेगड्या प्रकारचे तब्बल दोन हजार दगड आहेत. यात विविध आकार ,पक्षी -प्राण्यांची चित्र असलेले ,इंग्रजी अक्षरे असलेले , धातुमिश्रित , चुनखडीचे , एकात एक मिश्रित आणि वेगवेगळ्या प्रकारांच्या दगडांचा समावेश आहे.तर काही दगडांमधे  विजेच्या प्रकाशात  वेगवेगळे रंग दिसतात. अश्या विविध प्रकारचे  दगड प्रत्यक्षपणे विध्यार्थीना बघता आली व त्यांची माहिती समजून घेता आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्तावीक बादल बेले यांनी केले. 
  
यावेळी भूपृष्ठावर व त्याखाली आढळनार्या खडकांविषयीची माहिती देण्यात आली. खडकांच्या विविध प्रकारांवर प्रकाश टाकण्यात आला. पाठ्यपुस्तकातिल पाठांना प्रात्यक्षिकाची जोड़ दिल्यास विध्यार्थीना ते अधिक चांगल्या प्रकारे समजते त्यामुळे असे उपक्रम राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नलीनी  पिंगे यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहायक शिक्षिका जयश्री धोटे यांनी केले. ही प्रदर्शनी विध्यार्थीना उपलब्ध करून दिल्याबद्दल विध्यार्थीनी राजू भोयर यांना पक्ष्यांचे बर्ड फिडर देऊन स्वागत केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने