Top News

१६ वर्षांपासून पीएफच भरला नाही.

वाहनचालकांची तक्रार; गोपानी आयरन अॅण्ड पॉवर कंपनीचा प्रताप.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथून जवळच असलेल्या ताडाळी एमआयडीसी येथील गोपानी आयरन अॅण्ड पॉवर या कारखान्यातील वाहनचालक या पदावर कार्यरत असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलाच जात नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणाची ऑनलाइन तक्रार करण्यात आल्यानंतर आता पीएफ विभाग काय कारवाई करणार याकडे कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

ताडाळी एमआयडीसी येथील गोपानी आयरन अॅण्ड पॉवर या कारखान्यात चंद्रप्रकाश डहाट व  अशोक कोटा हे मागील अंदाजे १६ वर्षांपासून तर जालिंद्र उर्फ जीतू दुर्गे हे मागील १० वर्षांपेक्षाही जास्त कालावधी पासून वाहनचालक (ड्रायव्हर) या पदावर कार्यरत आहेत. मात्र आजतागायत कारखान्याने या कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलाच नाही. कर्मचार्‍यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकदा पीएफ भरण्याची विनंती करण्यात आली. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. मात्र आता या प्रकरणाची रितसर तक्रार करण्यात आल्यामुळे पीएफ विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑनलाइन तक्रार दाखल केली त्यावेळी कारखान्यात ४ वाहनचालक कार्यरत होते. मात्र तो चौथा वाहनचालक काही महिन्यांपूर्वीच नोकरी सोडून गेला. व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.  न्याय व हक्क मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उर्वरित तीनही ड्रायव्हरांनी दिले. सोबतच ऑनलाइन तक्रारीला जोड म्हणून पीएफ कपात होत नसल्याची स्वतःची लेखी तक्रारही वाहनचालकांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने