अन् माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे असे ऋण फेडले!

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- शाळा ही विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारी, त्यांच्यावर चांगले संस्कार करणारी किंबहुना त्यांचे जिवन घडविणारी एक सामाजिक संस्था असते. म्हणूनच शाळा आणि शिक्षक यांचे ऋण मनुष्य कधीही विसरु शकत नाही.ते फेडण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. अशातलाच एक मार्ग निवडून तालुक्यातील  चंदनखेडा येथील माजी विधार्थ्यांनी आपल्या शाळेचे ऋण फेडले आहे. 

          चंदनखेडा येथील नेहरु विद्यालय ही एकेकाळी थुटे आडनावाच्या मुख्याध्यापकाच्या शिस्तीमुळे नावारुपास आलेली शाळा आहे.या शाळेतून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी मोठ-मोठ्या हुद्द्यावर पोहोचले.त्यामुळे या शाळेचे आपल्याला काही देणे लागते.या कृतज्ञतेच्या भावनेतून काही माजी विद्यार्थ्यांनी  जे विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत,त्यापैकी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले पाहिजे असा विचार केला.त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना हा विषय समजावून सांगितला.शाळेकडून परवानगी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन, पेन्सिल, फळे, मिठाई वाटून आपल्या जुन्या आठवनींना उजाळा दिला. 

                 यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पुनवटकर, मडावी बाबू, मधुकर चौधरी, नरेंद्र आस्कर, प्रवीण निवडिंग, अविनाश लोणकर, संजय ब्राम्हणकर, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल हनवते, चंद्रशेखर निमजे, मंगेश नन्नावरे, प्रशांत श्रीरामे, गणेश हनवते, प्रशांत नन्नावरे, आशिष हनवते उपस्थित होते.