🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पोंभुर्णा शहर राज्‍यात विकासाचे मॉडेल ठरेल:- आ. सुधीर मुनगंटीवार

अत्‍याधुनिक क्रिडा संकुल, गाव तलावाचे सौंदर्यीकरण, व्‍यायामशाळा, राजराजेश्‍वर मंदीर परिसराचे सौंदर्यीकरण या विकासकामांचे लोकार्पण संपन्‍न.
Bhairav Diwase.    Feb 13, 2021
पोंभुर्णा:- पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात आम्‍ही विकासाची अभूतपूर्व कामे पूर्णत्‍वास आणली. ज्‍या शहरातील नागरिक, कार्यकर्ते विकासासाठी एकदिलाने उभे राहतात त्‍याठिकाणी विकास निश्‍चीतपणे होतो. पोंभुर्णा शहराच्‍या विकासासाठी नागरिक एकत्रीत उभे राहिल्‍यामुळे हा विकास शक्‍य होवू शकला. पोंभुर्णा शहरात व्‍हाईटहाऊसची प्रतीकृती असलेली नगर पंचायतची इमारत, सर्व क्रिडा विषयक सोयींनी परिपूर्ण असलेले क्रिडा संकुल, पर्यटकांना मोहीत करणारा सुंदर गावतलाव, इको पार्क अशा विकासाच्‍या विविध पाऊलखुणा आम्‍ही निर्माण केल्‍या आहेत. येत्‍या काळात पोंभुर्णा शहर राज्‍यात विकासाचे मॉडेल ठरेल, असा विश्‍वास विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला.
 


दिनांक १३ फेब्रुवारी रोजी पोंभुर्णा शहरात तालुका क्रिडा संकुल, गाव तलावाचे सौंदर्यीकरण, व्‍यायामशाळा तसेच श्री राजराजेश्‍वर मंदीर परिसराच्‍या सौंदर्यीकरणाच्‍या कामाचे लोकार्पण संपन्‍न झाले. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले होत्‍या तर प्रमुख अतिथी या नात्‍याने जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, उपसभापती सौ. ज्‍योती बुरांडे, नगर पंचायतीचे माजी अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, सौ. श्‍वेता वनकर, माजी उपाध्‍यक्षा सौ. रजिया कुरैशी, अरूण कोतपल्‍लीवार, अजित मंगळगिरीवार, नंदकिशोर तुम्‍मुलवार, ईश्‍वर नैताम, महेश रणदिवे, ऋषी कोटरंगे, वैशाली बोलमवार, विनोद कानमपल्‍लीवार, नरेंद्र बघेल आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
 यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, पोंभुर्णा शहरात आम्‍ही विकासाची दिर्घमालिका तयार केली आहे. प्रामुख्‍याने ग्रामीण रुग्‍णालयाचे बांधकाम, नगर पंचायत इमारतीचे बांधकाम, टुथपिक उत्‍पादन केंद्र, अगरबत्‍ती उत्‍पादन केंद्र, बांबु हॅन्‍डीक्रॉफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट, महिलांना रोजगार देण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्पेट तयार करण्‍याचे केंद्र यासह शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यांचे सिमेंटीकरण, दुभाजक व पथदिवे बसविणे, पंचायत समितीच्‍या नविन इमारतीचे बांधकाम, आकर्षक वनविश्रामगृह, भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी स्‍मृती इको पार्क, स्‍टेडियमचे बांधकाम, पोंभुर्णा शहरात महात्‍मा ज्‍योतीबा फुले सभागृहाचे बांधकाम, संताजी जगनाडे महाराज सभागृहाचे बांधकाम, पत्रकार भवनाचे बांधकाम पुर्णत्‍वास आले असुन  बसस्‍थानकाचे बांधकाम मंजुर करण्‍यात आले आहे.७ कोटी रु. किंमतीची पाणी पुरवठा योजना, भूमीगत नाली बांधकाम, चौक सौंदर्यीकरण, आधूनिक व्‍यायाम शाळा, आयटीआयचे नूतनीकरण, तलाव सौंदर्यीकरण आदी कामे मंजुर करण्‍यात आली असुन काही कामे प्रगतीपथावर आहेत. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय जनतेच्‍या सेवेत रुजु झाले आहे. आदिवासी मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहाचे बांधकाम मंजुर करण्‍यात आले. शहरात आरो मशीन द्वारे शुध्‍द पिण्‍याच्‍या पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. पाणी स्‍वच्‍छता पार्कचे बांधकाम करण्‍यात आले आहे. आकर्षक व अत्‍याधुनिक अशा आठवडी बाजाराचे बांधकाम पुर्णत्‍वास आले आहे. या परिसरातील सांस्‍कृतीक चळवळीला वेग देण्‍यासाठी खुल्‍या नाटयगृहाचे बांधकाम सुध्‍दा होवु घातले आहे. यासोबतच पोंभुर्णा तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात रस्‍ते व पुलांची बांधकामे मोठया प्रमाणावर पुर्णत्‍वास आली आहे. पोंभुर्णा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय सुध्‍दा जनतेच्‍या सेवेत रूजु झाले आहेत. स्‍वर्गरथ, बगीचे, आदिवासी महिलांची राज्‍यातील पहिली महिला कुक्‍कुटपालन संस्‍था, मधमाशी पालन प्रकल्‍प, बंधारे बांधकाम असे विविध प्रकल्‍प या भागात आम्‍ही पूर्णत्‍वास आणले. या तालुक्‍यातील तरूणांना रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍या यासाठी एमआयडीसी च्‍या निर्मीतीसाठी आम्‍ही प्रयत्‍नशील आहोत. विकासकामांची उदघाटने, लोकार्पण हे केवळ चंद्रपूर जिल्‍हयातच होत आहेत कारण अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात मोठया प्रमाणावर निधी आम्‍ही उपलब्‍ध करून दिला आहे. यापुढील काळातही विकासाचा हा झंझावात असाच गतीने पूढे न्‍यायचा असून यासाठी नागरिकांचे प्रेम व सहकार्य सदैव अपेक्षित असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.
  
यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, अलका आत्राम, गजानन गोरंटीवार यांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भास्‍करवार यांनी केले. श्री राजराजेश्‍वर मंदीराच्या प्रांगणात झालेल्‍या मुख्‍य कार्यक्रमाला पोंभुर्णा येथील नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.