विद्युत बिला संदर्भात पोंभुर्णा तालुका मनसे आक्रमक.
पोंभुर्णा:- आज दि 04 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पार्टी तर्फे वीज वितरण कंपनी कार्यालय पोंभुर्णा इथे मनसेचे जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगुलवार यांच्या प्रमुख नेतृत्वात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली व संबंधित अधिकाऱ्यांना वीज बिला संदर्भात निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील कोणत्याही वीज ग्राहकाचे वीज पुरवठा खंडित करू नये अशी सूचना व निवेदन देण्यात आले, तसेच वीज कापण्यासाठी कोणताही कर्मचारी गाव/ खेड्यात आल्यास गंभीर परिणाम होतील अश्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या . यावेळी मनसे पोंभुर्णा तालुका अध्यक्ष आकाश तिरुपत्तीवर, मनसे तालुका उपाध्यक्ष किशोर वाकुडकर, मनविसे तालुका अध्यक्ष आशिष नैताम, मनसे शहर अध्यक्ष निखिल कन्नाके, मनसे तालुका सचिव अमोल भाऊ ढोले, पवन बंकावार, कौशल चिचघरे, प्रशांत फुलझेले, संतोष पेंदोर, कुणाल बुरांडे, निखिल शेट्टे, राजेश गेडाम, नूतन नैताम, वैभव घाटबांधे, महेश नैताम, प्रमोद ढाक, प्रज्योत मानकर, देवा मानकर, आशिष आर नैताम, आदी पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.