चंद्रपूरः- जिल्ह्यात आत्महत्या व हल्ल्यात वाढ होत असून वरोरा शहरातील रत्नमाला चौक परिसरात एका युवकावर तीन युवकांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात युवक गंभीर जखमी झाला. वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.
सदर हल्ल्यात जखमी युवकाचे नाव गणराज गोविंद गेडाम (वय २१, रा. दत्तामंदिर वॉर्ड वरोरा) असे आहे. गणराज गेडाम हा काम शोधण्याकरिता रत्नमाला चौकातून ले-आउटकडे जात असताना अनिकेत राजेश श्रीरंग (वय २०, रा. जिजामाता वॉर्ड) व त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या युवकांस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे