🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

वासेरा येथे भव्य मोतीबिंदू तपासणी शिबीर.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील अवग्या 10 किमी अंतरावर असलेला मौजा- वासेरा या गावाम्हध्ये सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम, लायसन्स क्लब चंद्रपूर, तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ वासेरा व जि. प. सदस्य मा. रमाकांत भाऊ श्रीधरराव लोधे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने दिनांक14 फरवरी सकाळी 11 ते 04 वाजेपर्यंत "विनामूल्य मोतीबिंदू तपासणी" शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. 

        सदर शिबिराचे उद्घाटन मा. विजय भाऊ वडेट्टीवार पालकमंत्री यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष स्थानी जि. प.चंद्रपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. राहुल कर्डीले साहेब असणार आहेत. समस्त गावकऱ्यांनी या मोतीबिंदू शिबिराला हजेरी लावून लाभ घ्यावा असे आव्हान शिबिराचे आयोजक व संयोजक मा. रमाकांत भाऊ लोधे यांनी केले आहे.