Top News

शेगाव बु. येथे ज्येष्ठ नागरिकांकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोवीड-19 लसीकरणा चा शुभारंभ.

राजूभाऊ गायकवाड अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर नरड वरोरा
वरोरा:- शेगाव बु येथे आज दि 10/3/2021 ला  प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोवीड-19 लसीकरणाचा शुभारंभ राजू भाऊ गायकवाड अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक करीता कोवीड-19 लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. 
    कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ पाटील सरपंच शेगाव बु, प्रमुख उपस्थिती आरोग्य अधिकारी डॉ मदनकर मैडम,  सचिनभाऊ नरड जिल्हा महामंत्री भाजयुमो ,मानकर सर , राजुभाऊ बच्चुवार, ईश्वर नरड, अजय लोडे , विजय बरडे , महेश देवतळे ,शरद आत्राम , ज्येष्ठ नागरिक ,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. आणी शेगाव बु ग्रामपंचायत मध्ये भेट देण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने