माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणावर MPCB च्या अधिकाऱ्यावर दबाव.

प्रहार संघटनाच्या पत्रावर दीड दोन महिन्यांपासून कार्यवाही नाही.

शहरात पडणारा डस्ट जमा करून MPCB अधिकाऱ्यांच्या टेबल वर नेऊन टाकणार, प्रहरच्या बिडकरचा इशारा.
Bhairav Diwase.    March 10, 2021

कोरपना:- प्रहार संघटना गडचांदूर सतिश बिडकर यांनी दिड महिन्यापासून माणिकगड कंपनी च्या प्रदूषणा बाबत MPCB याना पत्र देऊन माणिकगड कंपनीच्या चिमणीतून  निघणाऱ्या धूराचा व्हिडीओ व फोटो देण्यात आला. 

     परंतु दीड महिन्या पासून त्या पत्रावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, अधिकारी कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत का? असा प्रश्न बिडकर यांनी उपस्थित केला आहे. बिडकर यांनी MPCB चे SRO कारे यांना फोन करून विचारले असता त्यांनी त्यांच्या खाली काम करणाऱ्या अधिकारी पाटील यांना कार्यवाही करण्यास सांगितले असता. त्यांनी आज पर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. अधिकारीच मोठ्या अधिकाऱ्यांच ऐकत नसेल तर मोठ्या व लहान अधिकाऱ्यांना फुकट पगार कशाला बिडकर यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर घेतले. तात्काळ कार्यवाही नाही झाली तर शहरातला जमा होणारा डस्ट जमा करून अधिकाऱ्यांच्या टेबलवर नेऊन टाकण्यात येईल असा इशारा प्रहार चे बिडकर यांनी MPCB चे अधिकारी कारे  यांना फोन वर बोलून दाखविला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने