आनंदवन ठरतंय कोरोनाचं नवीन हॉट-स्पॉट.

आतापर्यंत 239 जण पॉझिटिव्ह; 02 मृत्यू.
Bhairav Diwase.    March 10, 2021
वरोरा:- ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची कर्मभूमी असलेल्या आनंदवनात अचानक कोरोनाचा उद्रेक झाला असून आतापर्यंत आनंदवनातील 239 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून 02 जणांचा मृत्यू झाला आहे. आनंदवनमध्ये पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
        आनंदवन येथे आतापर्यंत 1200 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून दररोज 250 लोकांची चाचणी केल्या जात आहे. कोरोनाचा हा उद्रेक गेल्या एका आठवड्यात अचानक झाला आहे. 
 
        प्रशासनाने या ठिकाणीच एक कोविड केअर सेंटर तयार केले असून सध्या याठिकाणी 83 लोकांवर उपचार सुरू आहे. आनंदवनमध्ये झालेल्या कोरोनाच्या या उद्रेकाबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे कारण गेल्या एक वर्षापासून आनंदवनमध्ये बाहेरील लोकांना प्रवेश बंदी आहे.
 
         त्यामुळे उपचारासाठी बाहेर गेलेल्या एखाद्या आनंदवनमधील व्यक्तीमुळे हा संसर्ग आत आल्याची आणि या ठिकाणी सर्व व्यवस्था सामुदायिक असल्यामुळे तो तातडीने पसरल्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या