Top News

Ajay Devgn viral video: दिल्लीमध्ये अजय देवगणला कथित मारहाणीचा "तो" व्हिडीओ फेक.

Bhairav Diwase.   March 29, 2021
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ.....
👇👇👇👇👇👇👇

बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगणला कथित मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थन न करण्यावरुन आणि सरकारची बाजू घेतल्यामुळं दिल्लीतील एका पबच्या बाहेर काही लोकांनी अजय देवगणला मारहाण केली, अशा आशयासह एक व्हिडीओ कालपासून व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडीओत मारहाण होत असलेली व्यक्ती अजय देवगण नाही, असं अजयच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

या व्हिडीओमध्ये मारहाण होत असलेल्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मात्र हा व्हिडीओ व्हायरल करत हा व्यक्ती अजय देवगण असल्याचं सांगितलं गेलं. एबीपी न्यूजनं या संदर्भात अजय देवगणशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता या कथित व्हिडीओतला व्यक्ती अजय देवगण नसल्याचं सांगितलं गेलं. हा व्हिडीओ खोटा आणि अफवा पसरवणारा असल्याचं त्यांनी सांगितलं.
अजय देवगणच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, दिल्लीतील एका पबच्या बाहेरील एका भांडणाचा व्हिडीओ आला आहे. त्यात अजय देवगण असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे खोटं आहे. अजय देवगण यावेळी 'मैदान' 'मेडे' आणि 'गंगूबाई काठियावाड़ी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मागील 14 महिन्यांपासून अज देवगणनं दिल्लीत पाऊल देखील ठेवलेलं नाही, असं सांगण्यात आलं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने