Top News

आदिवासी शेतकऱ्यांच्या शेताची नासधुस, पोलिसांत तक्रार दाखल.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील खुटवंडा(दी.) येथील गरीब आदिवासी शेतक-याच्या शेतात जेसीबी मशीन चालवून शेतजमिनीचे नुकसान करणा-या इसमाविरुद्ध भद्रावती पोलिस ठाण्यात दि.२७ मार्च रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे.       
          प्राप्त माहितीनुसार, खुटवंडा(दी.) येथील गरीब आदिवासी शेतकरी रामचंद्र जना आळे यांना शासनाकडून भूमापन क्र.२१८ मधील १.०१ हे. आर. जमिनीचा पट्टा मिळाला आहे. त्यांच्या शेतजमिनीवर ग्राम पंचायत पळसगाव(शि.) ने चालू वर्षात म.गां.रो.ह.योजने अंतर्गत धान गाट्यावर मातीकाम केलेले आहे.दरम्यान, दि.२७ मार्च रोजी सकाळी ८.२५ वाजता अमृत धनवटे यांचा नोकर संतोष बाळकृष्ण कन्नाके व विनोद चिकाटे यांनी बिना क्रमांकाची जेसीबी मशीन आणून आळे यांच्या शेतात टाकलेली माती उचलून फेकून दिली. त्यामुळे आळे यांच्या शेतजमिनीची नासधुस होऊन त्यांचे ५० हजाराचे नुकसान झाले.याबाबत आळे यांनी अमृत धनवटे यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने