Top News

आरोग्य विभागाचा पेपर परीक्षेआधीच फुटला.

सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल.....
Bhairav Diwase.     March 01, 2021
नागपूर:- आरोग्य विभागाद्वारे काढण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. मात्र, दुपारच्या सत्रातील पेपर फुटल्याची तक्रार नोंदविण्यात आली. दुसरीकडे परीक्षेदरम्यान विभागाकडून केलेल्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. यावरही विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला.

आरोग्य विभागाद्वारे मानसशास्त्रज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ, समुपदेशक, कनिष्ठ लिपिक, सामाजिक पर्यवेक्षक अशा साडेआठ हजार पदांसाठी रविवारी (ता. २८) राज्यातील विविध केंद्रांवर दोन सत्रात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. एकाच दिवशी सर्वच पदांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आल. विदर्भातील उमेदवारांना मुंबई, पुणे या शहरात तर जळगावच्या विद्यार्थ्यांना नागपूर, चंद्रपूर येथे परीक्षा केंद्र देण्यात आले. त्यामुळे उमेदवारांमध्ये रोष व्यक्त करण्यात आला.

सकाळच्या सत्रात पहिला तर दुपारच्या सत्रात दुसरा पेपर घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नागपूर केंद्रावर दुसऱ्या सत्रातील पेपर सुरू होण्याआधीच फुटल्याची तक्रार करण्यात आली.आरोग्य सेवक भरती ........

पेपर 28 फेब्रुवारी

पहा किती गोंधळ चालतो.....हे जर असच राहल तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं काय ........🤔🤔

वरील व्हिडिओ कुठला आहे हे अद्यापही कळू शकले नाही. पण सोशल मीडियावर व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करतांना एक मजकुर लिहून व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने