चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे राष्ट्रिय विज्ञान दिवस साजरा.


Bhairav Diwase.      March 01, 2021
पोंभुर्णा:- देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमन यांनी रामन परिणामाचा शोध लावला. यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. तेव्हापासून 28 फरवरी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्व शासकीय विभागांमध्ये त्याप्रमाणे सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये हा दिवस खूप उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा हे  आहे. महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

      या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक संतोष कुमार शर्मा, प्राध्यापक सतीश पिसे, डॉक्टर मेघा कुलकर्णी, डॉक्टर विनोदकुमार, डॉक्टर सुशील कुमार पाठक उपस्थित होते. सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने