Top News

एका प्रेमी युगलांनी केली रेल्वे रुळावर आत्महत्या

Bhairav Diwase.     March 01, 2021

(संग्रहित छायाचित्र)

वरोरा:- शहरातील महाकाली नगरी लेआऊट जवळील रेल्वे पोल क्रमांक 834 /20.25 डाऊन लाईनवर एका प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची दुःखद घटना 1 मार्चला उघडकीस आली असून प्रेमीचे नावआकाश मेश्राम वय 22 वर्ष राहणार गोविंदपूर तालुका समुद्रपूर तर प्रेमीकेचे नाव मयुरी वय 17 वर्ष राहणार भद्रावती असे आहे.

DNR या खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये 20 वर्षीय तरुणीचा बस वाहकाने केला विनयभंग.

रुग्णालयातील शौचालयात आढळले ७ महिन्याचे भृण (मृत बालिका).
 https://www.adharnewsnetwork.com/2021/03/blog-post_11.html?m=1

आत्महत्येपूर्वी मयुरी ही दिनांक 28 फेब्रुवारीला सकाळी शाळेत जाते म्हणून घरून निघून गेली होती मात्र त्यानंतर ती घरी गेलीस नाही. पाहणी करत असतांना रेल्वेगार्डने स्टेशन मास्टर यांना दोन जणांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. रेल्वे विभागाकडून पोलीस स्टेशन वरोरा यांना माहिती दिल्यावर पोलिस घटनास्थळी गेले असता त्यांना एम एच 32F 9685 क्रमांकाची दुचाकी दिसून आली काही अंतरावर युवक-युवती चे कटलेल्या अवस्थेत प्रेत दिसून आल्याने पोलिसांनी युवका जवळील कपड्यांमध्ये आधार कार्ड वरून ओळख पटवली मात्र युवतीजवळ काहीही आढळून आलेले नाही तिची ओळख पटणे कठीण झाले होते.शेवटी युवतीच्या डायरीमधील नंबर वरून युवती भद्रावती येथील असल्याचे कळताच वरोरा पोलिसांनी भद्रावती पोलिसांशी संपर्क साधला असता युवती मेहता हॉस्पिटल मागे राहत असल्याची माहिती मिळाली.

सदर दोन्ही ची प्रेते पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. युवक युवती मधे प्रेम कधी जुळले व त्यांच्यात नेमका वाद काय झाला? हे अजून गूलदस्त्यात आहे मात्र अगदी अल्पवयीन प्रेमी युगलांनी अशाप्रकारे आत्महत्या करावी त्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास ठाणेदार खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पेंढारकर करीत असल्याची माहिती आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने