Top News

येनबोथला येथे महाशिवरात्री देवदर्शनासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू.

Bhairav Diwase.     March 11, 2021
गोंडपिपरी:- तालूक्यातील येनबोथला येथे नदी स्थळी देव-दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. अश्यातच आज 11 मार्च रोजी रोहित जोगेश्वर देठे हा युवक आई सोबत येनबोथला येथे आला असता आंघोळी करीता मित्रा सोबत पाण्यात उतरला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

                महाशिवरात्री दरम्यान तालुक्यातील बरेच भाविक येनबोथला येथे देव दर्शनासाठी गोळा होतात.
कोविळ -19 च्या संसर्गामुळे प्रशासनाने विदर्भाची काशी म्हणून ओळख असणाऱ्या मार्कंडा (देव) चपराळा, कुलथा या प्रसिद्ध स्थळी महाशिवरात्री दरम्यान जी भव्य यात्रा भरली जाते. तिथे भाविकांची गर्दी होत असल्याने
सदर ठिकाणी यात्रा भरविण्यास प्रशासनाने मज्जाव केला. 

     गोंडपीपरी येथील रोहित जोगेश्वर देठे वय 16 वर्ष नामक युवक आंघोळी करिता नदीत उतरला होता आंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली. हजर असलेल्या भाविकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले असून एका स्कारपीओ वाहनात टाकून ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरीला नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत. रोहित च्या जाण्याने देठे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने