वाळू माफीयाच्या हौदोसाने देवाळा खूर्द गावात प्रचंड पाणी टंचाई ची झळ.

Bhairav Diwase
नदी, नाले, विहीरी झाल्या कोरड्या, शेतीची अवस्था बिकट; नागरिकांची पाण्यासाठी वनवन.
Bhairav Diwase.    March 25, 2021
पोंभूर्णा:- उन्हाळ्याच्या तोंडावर देवाडा खुर्द येथे भिषण पाणी टंचाई संकट उभे ठाखले असतांना ही देवाडा खूर्द मध्ये राजरोष, नदीच्या पाञातुन रेतीचा उपसा अजूनही सुरु आहे. याकळे तालूका प्रशासन झोपेचे सोंग घेतल्याचे दिसत आहे. जर अशीच परीस्थिती राहल्यास, तर भविष्यात पाण्यासाठी हाहाकार माजल्या शिवाय राहणार नाही व पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकंती करावी लागणार आहे.

     पोभुर्णा तालुका हा आदीवासी बहुल तालूका आहे. असुन या तालुक्याच्या सिमा, वैनगंगा नदीला जोडली. व ही नदी बारमाही वाहणारी नदी असुन सुध्दा पोंभूर्णा तालुक्याला काही गावांना तहानेने मरावे लागत, ही ग्राहक भागाची फारच बिकट परिस्थिती आहे. देवाळा खूर्द हे अंधारी नदीपासुन अवघ्या एक किलोमिटर अंतरावर आहे. गावातील काही सयंव घोषित व राजकीय मंडळी, सत्तेचा वापर करुन राञीचा खेळ चाले चा प्रयोग करीत आहेत. त्यामुळेच नदी पाञातील पाण्याची पातळी खोल जात त्याचा फटका सामान्य जनतेला बसत शासनाचा करोडो रूपयाचा महसुल बुडत आहे.
     
       देवाडा खूर्द येथे चार ते पाच टँक्टर मालक स्वंयव घोषित पुठार दर राञभर रेती तस्करी करुन अजुनही यांच्या वर या पाच वर्षात एकही केस होत नसल्याने कूठे पाणी मूरतय हे जनतेच्या लक्षात येत आहे. पर्यावरण प्रेमिचे असे म्हणने आहे कि, अवैध रेतीचा उपसा केल्यामूळे पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे गावातील विहीर व बंधारे कोरडे पडले. पाऊस सूरु होण्यासाठी चार महीने बाकी असताना ही परिस्थिती असेल तर मे महीन्यात या गावत फारच मोठा संकट येणार असल्याचे चित्र आहे. वेळीच प्रशासन जर,व रेती तस्कराच्या रेती वर आळा घातला नाही तर भविष्यात येणाऱ्या परिस्थिती ला तालुका शासनच जबाबदार राहणार.