जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी दिली भेट.
नागभीड:- नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथे श्रीमती मंदा विनोद आडे यांच्या घराला अचानक सकाळी आग लागली. त्याची माहिती मिळताच या क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी नागभीड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांच्या माध्यमातुन न.प. फायरब्रिगेड ची गाडी पाठवुन आग विझवली. तत्पुर्वी गावकऱ्यांनी विहिर व बोअरवेल च्या पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत त्या घराची पाहणी केली व पंचनामा करण्याचे निर्देश दिले. गावाच्या मध्यवर्ती भागात अचानक लागलेल्या या आगीत सदर महिलेचे घर पुर्णपणे जळले आहे. यात जीवनोपयोगी वस्तुंसह अन्नधान्य, कपडे, भांडे व इतरही वस्तु आगीत स्वाहा झाले आहे.
यावेळी गावचे सरपंच मॅडम कल्लू नेवारे , उपसरपंच मंगल बूराडे, सदस्य सतिश गायकवाड, गणेश गुरूनुळे, फुला गुरूनुलें, बेबी उईके, कैलास सोनुले, राजु सोनुले, सेवा सोसायटीचे अध्यक्ष राजु चौधरी आणि गावकरी मंडळी उपस्थित होते.