वढोलीत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात वढोलीकरांनी जिल्ह्यात आगळी वेगळी छाप सोडली आहे.धार्मिक सांस्कृतिक कार्यात सगळा गाव एकत्र येतो.याचा प्रत्यय नेहमी सर्वांना येत असतो.गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील श्री गजानन महाराज उत्सव सेवा समिती तथा गावकऱ्यांतर्फे ऋषीपंचमी निमित्य पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी गावावर कोणतेही संकट येऊ नये. गावात सुख, शांती, समाधान, समृद्धी गावकऱ्यांमध्ये एकजूट कायम राहावी. 
     या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केल्या जाते. या दिवशी संपूर्ण गावातील प्रतिष्ठाने बंद असतात. प्रत्येकाच्या घरा समोर पालखीचे स्वागत करण्याकरिता रांगोळी टाकली असते. संपूर्ण गावात स्वछता असते.मागील आठ ते दाहा वर्षांपासून ही परंपरा अविरत सुरू आहे.या प्रसंगी गावातून भव्य कलश यात्रा भजन दिंडीच्या माध्यमातून सोशल डिस्टन्स चे पालन करीत काढण्यात आली.सर्व नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले.अशवमेघ व मावळे सुद्धा दिंडीत होते.,गजानन महाराजांची वेशभूषा साकारण्यात आली. गण गण गणात बोते नावानी वढोली दुमदुमली.या कार्यक्रमात गावातील गुरुदेव सेवा भजन मंडळ गावातील सर्व नागरिक पंचक्रोशीत गावातील भक्त मोठ्या संख्येनी सहभाग घेतला.याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.