(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- नेहरू युवा केंद्र चंद्रपूर,युवा व खेळ मंत्रालय भारत सरकार तर्फे जिवती तालुक्यातील आनंदगुडा,कोलामगुडा, पिट्टीगुडा :-1, आंबेझरी, पाटण, पिट्टीगुडा:-2,नायवाडा, देवलागुडा, पल्लेझरी, हटकरगुडा, जनकापूर,चिखली,नंदप्पा या गावामध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात आले. यात आनंदगुडा व कोलामगुडा येथे स्वच्छता व श्रमदान कार्यक्रमा अंतर्गत ग्रीन गाव, स्वच्छ गाव, प्लास्टिक कचरा निर्मूलन करून ग्रामस्वच्छता, स्वच्छता शपथ घेण्यात आली. तसेच ,कोविड जनजागृतीविषयी चें गावात पोस्टर,व भिंतीवर चित्रफिती काडून गावात वेगवेगळ्या मोहिमा राबविण्यात आल्या.कॅच द रेन अर्थात सेव्ह वॉटर, पाणी आडवा पाणी जिरवा चें पोस्टर,लावून जनजागृती करण्यात आली.तर पिट्टीगुडा नं:-2 येथे सार्वजनिक स्वच्छता,कार्यक्रम राबविण्यात आला.तर आंबेझरी येथे पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम सेव्ह वॉटर, कॅच द रेन मोहीम राबवून,कोविड संदर्भात व सेव्ह वॉटर चे पोस्टर,लावण्यात आले.तर पाटण येथे ग्रामस्वच्छता करून स्वच्छता प्रभात फेरी काडून गावात स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.तर नायवाडा,देवलागुडा, हटकरगुडा, चिखली, जनकापूर,पल्लेझरी, नंदप्पा,पिट्टीगुडा नं:-2 येथे कॅच द रेन, सेव्ह वॉटर, अर्थात पाणी आडवा पाणी जिरवा,तसेच कोविड संदर्भात चें पोस्टर व गावोगावी लावण्यात आले. वृक्षलागवड, याबाबत गावोगावी जाऊन जनजागृती करण्यात आली, यावेळी नेहरू युवा केंद्राशी संलग्नित विविध मंडळाच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्र ता. प्रतिनिधी स्वयंसेवक गोविंद बापूराव गोरे यांनी जनजागृती संदर्भात, युवा मंडळांना सोबत घेऊन गावोगावी जनजागृती केली.