कोरोनावरील लस घेवून स्वत:ला सुरक्षीत करा.

Bhairav Diwase
0
जेष्ठ नागरिकांना जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांचे आवाहन.
Bhairav Diwase.     March 06, 2021
चंद्रपूर:- जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना या रोगाने संपूर्ण सरकारला अक्षरशः विचारात पाडले. संपूर्ण जग या कोरोना वर उपचार करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी भारतामध्ये कोरोना लस तयार करण्यात आली. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र जी मोदी आणि  त्यांचे संपूर्ण प्रशासन कामाला लागले. ग्राम पंचायत स्तरापासून ते जिल्हा स्तर ते राज्य स्तरावर कोरोना रोगावर कस विजय मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले. प्रत्येकांनी सॅनिटायजर, मास्क, वापरण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले.  


        शासनाने कोरोना या रोगावर उपचार करण्यासाठी लस तयार केली आणि त्याची  अमलबजावणी सुद्धा सुरू झाली. देशातील प्रत्येक नागरिकांना लस मिळाली पाहिजे यासाठी प्रशासनाने अनेक टप्प्यामध्ये सुरू केली . सध्या 45 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक तसेच 60 वर्षावरिल ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण सुरू केले आहे. याअंतर्गत दुर्गापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सौ. संध्या गुरनुले यांनी लस घेऊन मी देखील जेष्ठ नागरिक म्हणून लस घेतली आहे, तरी आपणही लस घेवून स्वत:ला सुरक्षीत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले यांनी ज्येष्ठ नागरिकांना केले आहे.
             
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, उपाध्यक्षा रेखा कारेकर, जिल्हा परिषद सदस्य ब्रीजभूषण पाझारे, बांधकाम सभापती राजु गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्षा यांचे स्वीय सहाय्यक राजेश ठेंगणे, वाहनचालक अमोल ढोके यांनी आज दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनावरील लस घेतली. यावेळी त्यांचे समवेत महिला व बालकल्याण सभापती रोशनी खान, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिलजी उरकुडे, समाजकल्याण सभापती नागराजजी गेडाम, दुर्गापूर ग्राम पंचायत चे सरपंच सौ. पूजा मानकर, उपसरपंच प्रज्योत पुणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आसुटकर उपस्थित होते.

       नागरिकांनी लस घेतल्यावरही हात धुणे, अंतर राखणे व नियमित मास्क वापरणे या त्रिसुत्री नियमांचे पालन करण्याबाबत सौ. संध्या गुरनुले यांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)