शेगाव बु. येथे रस्त्याचे भूमिपूजन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर नरड, वरोरा
वरोरा:- शेगाव बु. येथे रस्त्याचे आज 15/03/2021 भूमिपूजन समारंभ ‌पार पडला. शेगाव बु ग्रामपंचायत मध्ये नेहरू वार्ड मध्ये नाली व सिमेंट काँक्रीट रस्ताचे बांधकामाचे मा श्री सिद्धार्थ भाऊ पाटील सरपंच व साधनाताई मानकर उपसरपंच यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती उपविभागीय अभियंता टिपले साहेब, सचिनभाऊ नरड, तितरे साहेब ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यशवंत लोडे, सागर कामडी सदस्य, ईश्वर नरड, हेमंत शंभरकर, उदय बोकडे, तुषार कामडी, नितीन मानकर व गावकरी वर्ग उपस्थित होते.