Top News

चंद्रपुरात तिन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार.

आरोपीला अटक; दोन दिवसाची पोलिस कोठडी.
Bhairav Diwase.       March 27, 2021
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील  सावरकर नगरात शासकीय दूध डेअरी जवळील एका  3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना २५ मार्च २०२१ ला उघडकीस आली आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपी भीमराव गोंगले याला अटक करण्यात आली असून दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
           
        गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पीडित तिन वर्षाची चिमुकली घरी टीव्ही बघत होती.  शेजारी राहणारी महिला घरी आल्याने पीडितेच्या आईने दरवाजा उघडला, त्यावेळी पीडित मुलगी ही खेळण्यासाठी बाहेर गेली. आरोपीने संधी साधत मुलीला घरी नेले, व तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
                
         पीडितेच्या आईला संशय आल्याने आरोपी भीमराव गोंगले ला जाब विचारला असता त्याने उलट पीडितेच्या आईलाचं धमकी दिली. पीडितेचे वडील घरी आल्यावर त्यांनी तात्काळ मुलीला सोबत घेत रामनगर पोलीस स्टेशन गाठले. यावेळी पीडित मुलीच्या आईने नारी शक्ती महिला संघटनेला सोबत घेत भीमराव विरोधात तक्रार दिली. रामनगर पोलिसांनी आरोपी भीमराव गोंगले विरोधात बलात्कार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने