गडचिरोली:- महाराष्ट्रातील गडचिरोली शहरातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यावेळी संबंधित वाहनात चालकासहित एकूण चार जण उपस्थित होते. चंद्रपूर मार्गावरून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीने रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला जोरदार टक्कर मारली. हा अपघात इतका भीषण होता की, दुसऱ्या क्षणात ही गाडी रस्त्यावर पलटी झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
ही घटना घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीत अडकलेल्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह तिघांना बाहेर काढलं. त्यानंतर चारही जणांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चारही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. तसंच काही जणांना मुका मार लागला आहे. या अपघातनंतर काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पण कालांतराने क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त गाडी रस्त्यातून हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
या गाडीत गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्यासह चारजण होते. चंद्रपूर मार्गावर कारगिल चौकातून पुढे जात असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण हटलं आणि गाडी रस्ता दुभाजकाला जोरदार धडकली. गाडीचा वेग थोडा जास्त असल्याने गाडी जागेवर पलटी झाली. या अपघातात चारही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर काही लोकांनी चारही जणांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे.
या अपघातानंतर क्रेनच्या मदतीने सुमो गाडी घटनास्थळावरून हलवण्यात आली आहे. अपघात होताना या गाडीत एक चालक, दोन बॉडीगार्ड आणि प्रणील गिल्डा असे चारजण होते. या जीवघेण्या अपघातातून प्रणील गिल्डा आणि कर्मचारी सुदैवाने बचावले. विशेष म्हणजे प्रणील गिल्डा अवघ्या 3 दिवसांपूर्वी संबंधित पदावर रुजू झाले आहेत. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपाचार सुरू आहेत.