Top News

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, दीड किलोमीटर पर्यंत नेले फरफटत.

Bhairav Diwase.     March 27, 2021
गडचिरोली:- जंगलात मोहफुले वेचण्यास गेलेल्या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना गडचिरोली तालुक्यातील दिभना येथे उघडकीस आली. शोभा नामदेव मेश्राम (५०, रा. राजगाटा माल) असे मृत महिलेचे नाव असून, ती राजगाटा माल येथील रहिवासी आहे.

शोभा मेश्राम ही शुक्रवारी(ता.२६) दिभना येथील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेली होती. परंतु संध्याकाळ होऊनही परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. आज सकाळी वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमाक २ मधील जंगलात तिचा मृतदेह आढळून आला.

वाघाने तिला दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने