१५ तणसाचे ढिगारे आगीत जळून खाक.

Bhairav Diwase
0

Bhairav Diwase.    March 22, 2021
संग्रहित छायाचित्र
ब्रम्हपुरी:- शहराला लागूनच असलेल्या तसेच ब्रम्हपुरी नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या बोंडेगाव शिवारातील जवळपास १५ ते २० तणसांच्या ढिगांना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे गावातील काही तरुणांना दिसताच त्यांनी लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु लागलेली आग विझवू शकले नाही. यात सुमारे ५० ट्रॅक्टर तणसीचे ढीग जळून खाक झाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवू नका, तर कडक अंमलबजावणी करा.

लागलेल्या आगीत बोंडेगाव येथील शेतकरी दयाराम बगमारे, विलास करंबे, देवीदास कुत्तरमारे, विलास बगमारे, दिनेश करंबे यांचे तणसीचे ढीग ठेवलेले होते. अचानक आग लागताच जवळजवळ ठेवलेले सर्व ढीग जळून खाक झाले. आग मात्र नेमकी कशामुळे लागली, हे मात्र कळू शकले नाही.

सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी अग्निशामक दलाला मिळताच घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत तणसीचे ढीग पूर्णतः जळून खाक झाले होते. जनावरांचा चारा पूर्णपणे जळून खाक झाला असल्याने सदर शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्यांचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)