वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निषेध.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा तर्फे आज केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल डिजल गॅस दर वाढ, शेअर बाजार , बेसुमार वाढलेली बेरोजगारी, आकाशाला भिडलेली महागाई च्या विरोधात तहसील कार्यलया जवळ , पंचायत समिती चौक तसेच नगर परिषद जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा द्वारा केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
       
        या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर, युवक तालुका अध्यक्ष असिफ सय्यद , शहर उपाध्यक्ष रकीब भाई , युवक शहर अध्यक्ष स्वप्नील बाजूजवार, महिला शहर अध्यक्ष अर्चना ताई दादगाळ शहर उपाध्यक्ष राजू भाऊ दादगाळ, युवक तालुका उपाध्यक्ष सुजित कावळे , शहर कार्याध्यक्ष संदीप पोगला , अंकुश भोंगळे, जगदीश साटोणे, राहुल वनकर, प्रसाद देशमुख, एकनाथ कौरासे , मंगेश वाघमारे , जहीर खान , अक्षय पाहणपट्टे , विजय कुमरे, ऑस्टिन सावरकर, स्वप्नील वाढई, राजू भुरुले, अमोल ताटे व असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते  उपस्थित होते.