जिवती तालुक्यात अवैधरित्या चालू असलेली दारू तातडीने बंद करा.

Bhairav Diwase
आम आदमी पक्षाचे ता. उपाध्यक्ष श्री सुनील राठोड यांच्या वतीने जिवती तहसीलदारांना निवेदन.
 Bhairav Diwase. March 12, 2021
जिवती:- जिवती तालुक्यातील अवैध दारू विक्री तातडीने बंद करा आम आदमी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष श्री. सुनीलभाऊ राठोड यांच्या वतीने जिवती तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले चंद्रपूर जिल्हा पुर्णपणे दारू बंद असुन सुद्धा जिवती तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये खुलेआम दारूविक्री चालू आहे मग जिल्ह्यांमध्ये दारू बंद असुन सुद्धा हे दारू योतो आहे कुठुन हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो आहे महोदय या प्रकरणामध्ये लक्ष घालून पुर्णपणे जिवती तालुक्यातील दारूविक्रीला त्वरित थांबवा अन्यथा जिवती तालुक्यातील नागरिक रस्त्यावर उतरून या दारूविक्रीचा विरोध करणार तरी आपण या प्रकरणाची चौकशी करून आपण सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून दयाल म्हणून जिवती तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या वेळी आम आदमी पक्षाचे ता. उपाध्यक्ष श्री.मा. सुनीलभाऊ राठोड सचिव श्नी गोविंद गोरे विदर्भ राज्य आंदोलन समिती ता अध्यक्ष श्नी सुदामभाऊ राठोड अरविंद भाऊ चव्हाण गणेश जाधव विनोद पवार विशाल राठोड विनायक राठोड मथिन शेख प्रविण पवार व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते