वीज कनेक्शन कापल्यास कर्मचाऱ्यांना झोडून काढण्याचा इशारा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्राती:- वीज कनेक्शन कापणे त्वरीत थांबविण्यात यावे व कापलेले कनेक्शन त्वरीत जोडण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आज दि.१७ मार्च रोजी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्यात आला.
कोरोना काळातील वीज बिल माफ करण्यात येईल,असे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते.मात्र आताच्या अधिवेशनात हा निर्णय फिरवून वीज बिल न भरणा-या ग्राहकांचे वीज कनेक्शन कापणे सुरु केले.त्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमिवर येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दि.१५ मार्च रोजी विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांना एक निवेदन सादर करुन वीज कनेक्शन कापणे थांबविण्यात यावे अन्यथा घेराव करण्यात येईल असा इशारा दिला होता. परंतू त्याचा काहीही परिणाम न झाल्याने अखेर बुधवारी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्यात आला.यावेळी कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच २४ तासांच्या आत तोडलेले कनेक्शन जोडण्यात यावे अन्यथा आम्ही स्वत: जोडून देऊ. यापुढे ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडल्यास विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचा-यांना झोडपून काढू असाही इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष विजय इंगोले, महिला आघाडी तालुका अध्यक्ष संध्या पेटकर, कविता गौरकार, नगरसेवक सुशील देवगडे, सुनील खोब्रागडे, राहुल चौधरी, कपूर दुपारे, मंगल कांबळे, दिलीप साव, लता टिपले, नगरसेविका राखी रामटेके, सीमा ढेंगळे, रुपचंद निमगडे, रजनी कराडे, मेघा डोंगरे, मनोरमा परचाके, रविना ढाले, अनुराग खाडे, बालक चहांदे, विठ्ठल पुनवटकर, प्रकाश पेटकर आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.