Top News

सेल्फीच्या नादात दोघा भावांचा धरणात बुडून मृत्यु.

Bhairav Diwase.     March 22, 2021
नाशिक:- मालेगाव (अजंग) येथील दोघा सख्ख्या भावंडाचा विराणे धरणाकाठी सेल्फी घेण्याच्या नादात तोल गेल्यामुळे धरणात बुडून मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना घडली आहे. हर्षल देवीदास जाधव (22) व रितेश देवीदास जाधव (18) असे दोघा मरण पावलेल्या भावंडांची नावे आहेत. हर्षल हा नाशिक येथे इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला, तर रितेश हा मालेगावी मसगा महाविद्यालयात बारावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. दोघे भाऊ बुधवारी मालेगावाजवळील निमशेवडी येथून एक लग्न समारंभ आटोपून मोटार सायकलने परत येत होते. वाटेत त्यांनी धरणावर जाण्याचा बेत आखला.

धरणाच्या काठी उभे राहून सेल्फी घेण्याच्या नादात लहान भाऊ रितेश याचा पाय घसरला. त्याला वाचवण्याच्या नादात हर्षल देखील बुडाला. त्यांनी मोटारसायकल धरणाजवळ पार्क केली होती. त्यांचा चुलत भाऊ नंतर तेथे आला असता त्याचे लक्ष त्या मोटारसायकलकडे गेले. त्याला मोटारसायकल दिसली मात्र दोघे भाऊ दिसले नाही. काही वेळाने सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने