Top News

भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा पदाधिकारी तर्फे बी.एस.एन.एल टावरवर चढून आंदोलन.

चंद्रपूर जिल्हयातील शेतकरी कृषी पंप, व्यवसायीकदार, घरगुती विद्युत, ग्राहकांचे विदयुत कनेक्शन कापणे त्वरीत थांबवा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- ग्राहकाचे विज कनेक्शन कापनार नाही अशी घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती परंतू शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संपताच परत आपल्या निर्णयावर ठाम न राहता शेतकरी, लहान व्यापारी आणि गरिब नागरिकांचे विदयुत पुरवठा कापने सुरू केले आहे. हा जनतेवर होणारा अन्याय असून, आधीच कोरोनाच्या साथीमुळे शेतकरी, गरिब व्यापारी, गरीब नागरिक आर्थिक दृष्टया कमकुवत झालेले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने वीजबिल माफ करणे गरजेचे होते. परंतु घोषणा करून सुद्धा सरकार गोरगरिब जनतेची थट्टा करित आहे.

       विज बिल न भरणाऱ्या ग्राहकांची वीज तोडली जात आहे. ज्या जनतेनी सरकारला सत्तेवर बसविले सरकार त्या जनतेची पिळवणूक करित आहे. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर ग्रामिणचे संपूर्ण पदाधिकारी गोरगरीब जनतेच्या सोबत असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. वीज कनेक्शन तोडणे त्वरीत थांबवावे त्याकरिता आज दिनांक १४/०३/२०२१ रोजी इम्रान खान जिल्हाउपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा ग्रामिण आणि केतन शिंदे जिल्हा सचिव भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा ग्रामिण तर्फे आज आम्ही बी.एस.एन.एल टावरवर चढून आंदोलन करत आहोत. त्यांना जोपर्यंत मागणी लिखित स्वरूपात मिळत नाही तो पर्यंत खाली उतरणार नाही. जर आम्हाला बळजबरीने उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आम्ही आत्मदहन करू. जनतेत असंतोष निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी शासनावर राहिल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने