अपयश लपवण्यासाठी जुन्याच कामांचे लोकार्पण करून नव्याने श्रेय लाटण्याचा लोकप्रतिनिधीचा केविलवाणा प्रयत्न:- माजी आमदार ॲड. संजय धोटे

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या रुग्णालयासाठी अद्ययावत इमारत बाधकामास ०२ सप्टेंबर २०१४ ला मान्यता मिळाली. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू आणि निवडणूकांनंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले. तत्कालीन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून जून २०१८ मध्ये १४.१७ कोटी रुपयांची इमारत कामाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली. जुलै - २०१५ च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. वारंवार कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन तत्कालीन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करू त्यांनी आपल्या कार्यकाळात सन २०१९ पर्यंत काम पूर्ण करून घेतले. परंतु रुग्णालयात आवश्यक अद्ययावत उपकरणे खरेदी आणि वाढीव पडनिर्मिती साठी आरोग्य संचालनायलात विलंब झाल्याने त्यावेळी इमारतीचे लोकार्पण होऊ शकले नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालय इमारत तेव्हाच आरोग्य विभागाला हस्तांतरित करण्यात आली होती.
      परंतु तयार विकासकामांचे श्रेय लोटण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधी कडून होत आहे. आपली विकासकामाबद्दल असलेली अकार्यक्षमता व अर्थसंकल्पातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी असलेल्या अल्प तरतुदी लपविण्यासाठी आज रुग्णालय इमारत लोकार्पण कार्यक्रम घेतला आहे. प्रशासनाकडून कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यक्रमावर निर्बंध लावले जात असताना शासनाच्या नियमाला बाजूला सारून आज हा कार्यक्रम घेतला आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केला आहे.