Top News

जिबगाव ग्रामपंचायतला नवीन सभागृह बांधकामासाठी निधी मंजूर.


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या आमदार निधीतून मौजा जिबगाव ग्रामपंचायत ला नवीन सभागृह बांधकामासाठी निधी मंजूर करून दिलेला आहे. सदर सभागृह नविन वस्ती मध्ये मंजूर करून आज दि. 13/3/2021 स.10.00 वा भुमिपूजन सोहळा संपन्न झाला. 
   या कार्यक्रमाला उपस्थित विजय भाऊ कोरेवार सभापती पं.स सावली , राकेश पा. गड्डमवार अध्यक्ष स.गा.नि स सावली, पुरुषोत्तम चुदरी उपसरपंच ग्रामपंचायत जीबगाव,   अनिल भाऊ मशाखेत्री स.गा.नि स. सावली, नितिन भाऊ गोहणे स.गा.नि.स.तथा सरचिटणीस ता.कांग्रेस सावली, अंकूश वरंगटीवार संचालक कृषी उत्पन्न सावली, सौ. इंदिरा भोयर सदस्या,  सौ. मोनी उंदिरवाडे सदस्या , सौ.लिलाबाई भोयर सदस्या, सौ.दिक्षा भोयर सदस्या, राकेश गोलेपल्लीवार सदस्य, चक्रधर दुधे सरपंच उसेगाव, सुनिल पाल उपसरपंच उसेगाव व गावकरी मंडळी यांच्या उपस्थिती मध्ये भुमिपूजन सोहळा पार पडला. जिबगांव येथील ग्रामपंचायत चे नवनिर्वाचीत उपसरपंच व सदस्य यांनी सभापती कोरेवार तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने