(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- अगदी तोंडावर असलेल्या उन्हाळ्यात जनतेला भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याची ज्वलंत समस्या लक्षात घेऊन सोमनपल्ली गट ग्रामपंचायत अंतर्गत, मौजा रायपूर येथील वार्ड नं. १ येथून, शासनाच्या १५ व्या वित्त आयोग जलजिवन योजनेतून घरगुती नळजोडणी चे काम जलदगतीने हाती घेण्यात आलेले आहे.
सदर कामाचे भूमीपूजन सोमनपल्ली ग्रामपंचायतीचे विद्यमान नवनिर्वाचित सरपंच मा. श्री. निलकंठभाऊ गजानन निखाडे यांच्या शुभहस्ते दि १८/३/२०२१ रोज गुरूवार ला करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. निलेश पा. मडावी, सचिव श्री. बांबोळे साहेब, तसेच महादेव पा. मडावी, सखाराम पा. मडावी, गमतीदास पा. राऊत, सुरेश पा. मडावी, सुभाष पा. मेकलवार, तुकाराम पा.मडावी, मुनेशजी मंडलवार, गणपती पा.मडावी, उष्टू पा. पेंदोर ,विष्णू, पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.